‘देवगंधर्व’..भास्करबुवा बखले यांचे चरित्र..पण हा प्रस्तुत ग्रंथ त्यांच्या चरित्रापुरताच मर्यादित नाही, तर भारतीय अभिजात संगीत आणि ललित संगीत-विशेषःत मराठी नाट्यसंगीत ह्या अंगाचा अभ्यासपूर्ण रीतीने रचलेला संगीतविषयक संदर्भग्रंथ होय..या ग्रंथामुळे भास्करबुवांच्या संगीत कलेतील सर्वसंग्राहक वृत्तीचेही एक विलोभनीय स्वरुप डोळ्यांपुढे उभे राहते..संगीत क्षेत्रातील सूर-लयीची ही उपासना किती दृढ रितीने चालवायला हवी ह्याचे आदर्श उदा. ‘देवगंधर्व’ मधून वाचून लक्षात येते.